Home क्राईम माजी नगरसेवकाची दुचाकी जाळली

माजी नगरसेवकाची दुचाकी जाळली

0
29

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा हुडको येथील माजी नगरसेवकक जाकीर पठाण यांच्या घरावर हल्ला करून दुचाकी जाळून टाकल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडालेली आहे.

याबाबत माहिती अशी की, माजी नगरसेवक जाकीर खान रसूल खान यांच्यासोबत वाद असलेल्या मोहसीन उर्फ विंचू अय्युब खान, अफसर शेख अनवर भिस्ती (दोघे रा.शाहूनगर) व शेख शफी शेख शरीफ (रा.पिंप्राळा हुडको) या तिघांनी जाकीर यांच्या घरावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.तर जाकीर यांनी दरवाजा न उघडल्यामुळे तिघांनी घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवली. परिसरातील नागरिकांनी धाव घेत दुचाकी विझवली. या प्रकरणी जावेद रसूल खान यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound