यावल-भुसावळ मार्गावर मोठमोठे खड्डे; मोठया अपघातास आमंत्रण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल ते भुसावळ मार्गावरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासुन मध्यभागी अपघातास आमंत्रण देणारे व वाहनधारकाचे जिवघेणारे मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. या विषयाकडे यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देवुन हे रस्ते दुरूस्त करावे अशी मागणी अनेक दिवसांपासुन नागरिक व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या यावल ते भुसावळ या वर्दळीच्या मार्गावरील रस्त्यावर एका मॉल समोर व भुसावळ टी पाँईट जवळ व याच मार्गावरील असलेल्या काही अतंरावर महाराष्ट्र ग्रामीण बॅंके समोर रस्त्याच्या मध्ये भागी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. सद्या पावसाळयात या खुडयांमध्ये पाऊसाचे पाणी साचले की वाहनधारकांना या खड्याचा अंदाज घेता येत नसल्याने मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता असून या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने या विषयाकडे गांर्भीयाने घेवुन तात्काळ हे जीवघेणे दुरूस्त करावे अशी मागणी वाहनधारक व नागरीक करीत आहे.

Protected Content