सुरत-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । देशभरात लोकसभा निवडणूकीची जोरदार प्रचार सुरू आहे. अनेक ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान देखील झालं आहे. असे असले तरी लोकसभा निवडणूकीच्या अधिच भाजपचा उमेदवार बिनविरोधत निवडून आला आहे.
या उमेदवाराच्या माध्यमातून भाजपने आपले विजयाच खातं उघडलं आहे. सुरत येथील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध विजय झाला आहे. यात काँग्रेसचे उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. शिवाय माघारीच्या शेवटच्या दिवशी विरोधातील आठही उमेदवार यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक आयोगाने विजयाची घोषणा केली आहे.
सुरतमध्ये आधी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार प्यारेलाल भारती यांनी अर्ज मागे घेतला. मुकेश दलाल हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. दलाल हे सुरतच्या इतिहासात बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार ठरले आहेत.
दलाल यांच्या विजयाची औपचारिक घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. आता गुजरातमध्ये २५ जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत पूर्ण झाल्यानंतर मुकेश दलाल विजयी झाले आहेत.