मोठी बातमी : भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू; दोन चिमुकले जखमी

जळगाव/जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील टाकळी गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दोन चिमुकले जखमी झाल्याची घटना शनिवारी १० मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मयतांची मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहे. राहूल रामदास सुरसे वय-३० रा. चिखली ता. बुलढाणा आणि सुनिल सुरेश पवार वय ३५ रा.वराड ता.जळगाव असे मयत झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सुनिल पवार हा आपल्या कुटुंबासह शनिवारी १० मे रोजी बोदवड तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे लग्नासाठी गेला होता. लग्न आटोपल्यानंतर दुपारी चार वाजता सुनिल पवार याने मुलगा कार्तीक सुनिल पवार (वय-६) आणि पिया सुनिल पवार (वय-८) या दोघा मुलांना सोबत घेवून बोदवड-जामनेर रस्त्याने वराड गावाकडे दुचाकीने निघाला होता. रस्त्यावरील टाकळी गावाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सुनिल पवार आणि राहूल सुरशे हे जागीच ठार झाले तर सुनिलची दोन्ही मुले कार्तीक पवार आणि पिया पवार हे जखमी झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर रस्त्यावरील वाहनचालकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह आणि दोन्ही जखमी मुलांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मयतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास सहाय्यक फौजदार संजय महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी हे करीत आहे.

Protected Content