मोठी बातमी : हातचालाखीने वृध्दाची सोन्याची चैन व अंगठी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |एसएमआयटी कॉलेज परिसरात चोर फिरत असल्याची बतावणी करीत लॉन्ड्रीवर जात असलेलया वृद्धाला अंगावरील सोने काढण्यास सांगितले. त्यानंतर हातचालाखी करीत दगड बांधलेली पुडी वृद्धाच्या हातात देवून चोरटे तेथून पसार झाल्याची घटना रविवारी ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सायंकाळच्या सुमारास एसएमआयटी कॉलेज परिसरात घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मुक्ताईनगर कॉलनीत दिलीप श्रीराम झंवर हे वृद्ध आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. रविवारी ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते एसएमआयटी परिसरातील एक लॉन्ड्रीवर जात होते. परंतु लॉन्ड्री बंद असल्याने झंवर हे त्याला फोन लावत होते. यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. त्याने झंवर यांना परिसरात चोर फिरत असून तुम्ही असे सोने घालून फिरु नका असे सांगितले. त्यावर झंवर यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि बोटातील अंगठी काढून त्या व्यक्तीने खिशातून काढलेल्या कागदात गुंडाळली. याचवेळी दुचाकीवरुन एक इसम त्यांच्याजवळ आला. त्याने आपल्या साथीदाराला तुला वेगळे सांगावे लागेल असे म्हणत त्याला खडसावले. वृद्धाच्या अंगावरील सोने कागदाच्या पुडीत गुंडाळ्यानंतर त्या दोघ भामट्यांनी झंवर यांना तुम्हाला पाठीमागून कोणीतरी आवाज देत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्या चोरट्यानी हातचाखाली करीत सोने असलेली पुडी बदलवून त्या जागी दगड बांधलेली पुडी झंवर यांच्या हातात दिली.

दगड बांधलेली पुडी हातात देताच वृद्ध झंवर यांनी लागलीच ती उघडली असता, त्यांना दगड दिसून आले. त्यावेळी दोघ चोरट्यांनी विना क्रमांक असलेल्या दुचाकीवरुन तेथून पळ काढला. वृद्ध झंवर यांनी दोघ चोरट्यांचा काही अंतरापर्यंत माग काढला. मात्र ते चोरटे तेथून मुक्ताईनगरच्या दिशेने पसार झाले. यामध्ये वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात धाव घेतली.

Protected Content