मोठी बातमी : अट्टल गुन्हेगार ‘दाऊद’ला केले स्थानबध्द !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरासह इतर भागात तब्बल वेगवेगळे २७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार दाऊल याला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशान्वये नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरात खून, दरोडा, जबरी लुट, धमकी, जबरी चोरी, पोलीसांच्या ताब्यातून पळून जाणे, सरकार नोकरांवर हल्ला असे वेगवेगळ्या एकुण २७ गंभीर दाखल गुन्ह्यातील गुन्हेगार शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (वय-२४) रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारी मागे, अमळनेर याच्या विरोधात अमळनेर पोलीसांनी स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता.

गुन्हेगार शुभम उर्फ दाऊद उर्फ शिवम मनोज देशमुख हा गुन्ह्यात कारागृहातून सुटून पुन्हा शहरात दहशत निर्माण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, तसेच त्याला कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नव्हाता. सोबत काही शस्त्रे ठेवून नागरीकांना घाबरविण्याचा प्रयत्न करत होता. या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी चौकशी पुर्ण करून ३ जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार पुढील कारवाईसाठी पोलीस अधिक्षक यांनी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना पाठविला. गुन्हेगाराची गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेवून जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असून गुन्हेगार शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (वय-२४) रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारी मागे, अमळनेर याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश काढले.

जळगाव स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पो.ना. दिपक माळी, रविंद्र पाटील, किशोर पाटील, सिध्दार्थ शिसोदे तसचे अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी गुन्हेगाराला अटक करून जिल्हाधिकारी याच्या आदेशान्वये नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 

Protected Content