जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बजरंग बोगदा परिसरात तीन गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता किशोर रामादास कोळी वय २० रा. कांचन नगर, जळगाव पिस्तुल विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी किशोर कोळी याला अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुल पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह सपोनि अमोल मोरे, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चौभे, विजयसिंग पाटील, विजय पाटील, सचिन महाजन, अक्रम शेख, महेश महाजन, किरण चौधरी, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, ईश्र्वर पाटील, प्रियंका कोळी यांच्या पथकाने केली.