मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासाठी अधिवेशनात स्वतंत्र विधेयक मांडण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबीत आहे. या संदर्भात राज्य सरकारने अधिकृत भूमिका मांडली असतांनाही मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षणाची मागणी करतांना सगे-सोयरे यांचा मुद्दा देखील लाऊन धरला आहे. यामुळे आज आणि उद्या अशा दोन दिवसांचे राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
या अधिवेशनाला आजपासून सुरूवात करण्यात आली असून सकाळी मंत्रीमंडळाची बैठक झाली. यात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधेयक सादर करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या विधेयकामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे समजते. यावर आज अधिवेशनात चर्चा होऊन शिक्कामोर्तब होणार आहे.