मोठी बातमी : पाणीपुरी विक्रेत्यास कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करून लुटले !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉपजवळ लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत एका पाणीपुरी विक्री करणाऱ्या तरूणाच्या खिश्यातून दोन हजारांची रोकड काढली. त्यानंतर त्याला चौघांकडून लाकडी दांडका, लाथ्याबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी कोयत्याने जीवठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, गौतम हकिमचंद यादव वय २८ रा.खोटेनगर जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गौतम यादव हा खोटे नगर येथील स्टॉपजवळ पाणीपुरी विक्री करण्यासाठी उभा होता. त्यावेळी बुलेटवर गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत, गोलू पाटील सर्व रा. जळगाव हे चौघेजण आले. त्यानंतर यातील दादू कोळी याने हातात लोखंडी कोयता घेत गौतम यादव याला धाव दाखवत त्यांच्या जवळून २ हजार रूपये जबरी काढून घेतले. त्यानंतर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर एकाने लाकडी दांडका मारून गंभीर दुखापत केली. दरम्यान गौतम हा आपला जीव मुठीत धरून पळत असतांना दादू कोळी हा लोखंडी कोयता घेवून पाठलाग केला आणि जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर गौतमने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत, गोलू पाटील सर्व रा. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे. **

Protected Content