जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महायुतीच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ व रक्षा खडसे या आज २५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. परंतु उपमुख्यमंत्री यांना येण्यास उशीर होत असल्याने दोघांनी उमेदवारी अर्ज दुपारी १२ वाजता दाखल केला आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी महायुतीचे उमेदवार माजी आमदार स्मिताताई वाघ तर रावेर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी मिळाली आहे. स्मिताताई वाघ यांना लोकसभा निवडणूक लढविण्याची ही पहिल संधी आहे. परंतू विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना यावेळी तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभेतून देणार प्रत्यूत्तर !
बुधवारी २४ एप्रिल रोजी दुपारी महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार आणि श्रीराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडा यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आयोजित सभेत भाजपावर निशाणा साधून टिकास्त्र सोडले होते. याचा वचपा काढण्यात आली आज गुरूवारी २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता स्वातंत्र्य चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना आता महायुतीचे नेते प्रत्यूत्तर देणार आहे. याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
महायुतीचे शक्तीप्रदर्शन होणार !
महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यायला काही काळ उशीर असल्याने गैरसोय टाळण्यासाठी महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांनी आपापल्या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे.