जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकीकडे जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मंगळवारी अंतिम उमेदवारी यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. तर दुसरीकडे राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम २० डिसेंबर पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीत मतदानाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. याबाबत आता निवडणूकीचा पुढील निर्णय २० डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणुकी प्रक्रिया राबविण्यात येत असतांना राबविण्यात येत आहे. सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदत संपल्यानंतर मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी अंतीम उमेदवारी यादी व चिन्हवाटप करण्यात आले. दरम्यान राज्यात होवून घातलेल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये मतदारांनी निवडणुकीत सहभाग जास्तीत जास्त नोंदविण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क मधील तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात वर्ग “क” वर्ग “ड” तसेच वर्ग “ई” प्रकारच्या सहकारी संस्था त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक घेण्याचे प्रादेशिक केलेले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील “अ” व “ब” वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर २० डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. अशा राज्य शासनाचे आदेश काढले आहे.
या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघाचा देखील समावेश आहे. त्यामुळे मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या ४० उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. आता येथून पुढची मतदानाची प्रक्रिया ही २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार होते. राज्य शासनाच्या आदेशामुळे आता निवडणूक प्रक्रिया २० डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, असे आदेश विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्थेचे श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले आहे.