एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल येथील शासकीय गोदामामधील अतिरिक्त दिलेल्या बारदानाच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अव्वल कारकून आणि खाजगी पंटरला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी आहे. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय गोदाममधून बारदान विकत घेण्याचा कंत्राट मिळाला आहे. दरम्यान एरंडोल येथील शासकीय गोदामचे कीपर अव्वल कारकून नंदकिशोर रघुनाथ वाघ वय-४७, रा. एरंडोल यांनी तक्रारदार यांना कंत्राटीप्रमाणे नेमून दिलेल्या बारदान गोडाऊनमधून उचलल्यानंतर अतिरिक्त ७०० नग बारदान त्यांना इच्छा नसताना दिले व त्याच्या मोबदल्यात ७ हजार रुपयांची मागणी केली, असे न केल्यास तुझा कंत्राट रद्द करू आणि भविष्यात तुला कंत्राट मिळू देणार नाही असा दम दिला. दरम्यान या संदर्भात तक्रारदार यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता पडताळणीसाठी सापळा रचला. त्यानुसार तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना संशयित आरोपी नंदकिशोर रघुनाथ वाघ वय-४, रा.एरंडोल आणि खाजगी पेंटर हमजेखान मेहमूद खान पठाण वय-३९, रा. एरंडोल या दोघांना अटक केली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई
पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, राकेश दुसाने यांच्यासह आदी पथकाने कारवाई केली आहे.