भुसावळ-इकबाल खान | शहरातून मालेगावकडे जाणार्या ट्रकचा एलसीबीच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून तब्बल ५०० किलो गांजा जप्त केल्याची कारवाई आज केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीने आज भुसावळ शहरात मोठी कारवाई केली आहे. यात भुवनेश्वर येथून मालेगावकडे जाणार्या आयशर ट्रकमधून गांजा जात असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. या अनुषंगाने एलसीबीचे प्रमुख किसनराव नजन-पाटील यांनी पथक नियुक्त केले होते.
या पथकाने भुसावळ शहरात सापळा रचून सदर ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ट्रक थांबला नाही. यामुळे पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून ट्रक अडविला. यात या ट्रक मध्ये इलेक्ट्रीक सामान टेंन्ट चे सामाना खाली प्लास्टीक पिशव्यामध्ये लपऊन ठेवलेला ५०० किलोच्या वर सुकलेल्या अवस्थेतील गांजा आढळुन आला आहे.या गांजाचा बाजारभाव सुमारे ७५ लाखांपेक्षा जास्त इतका सांगितला जात असुन दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.