पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलाने दारू पिऊन गाडी चालवत दोन तरुणांना दिलेल्या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाला जामीन मिळाला असला तरी पुणे पोलिसांनी मंगळवारी आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल याला संभाजी नगर येथून अटक केली. दरम्यान, या प्रकरणी आणखी काही जणांना अटक करण्यात अलायी आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत असतांना आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोपीचे वडील विशाल अग्रवालचे वडील सुरेन्द्र अगरवाल ह्यांचे अंडरवर्ल्डसोबत संबध असल्याचे पुढे आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती आहे.
पुणे हीट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विशाल अगरवाल ह्याला आज कोर्टापुढे हजर केले जाणार आहे. दरम्यान, भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणी अजय भोसले या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान भोसले यांच्या प्रकरणात देखील पुणे पोलिसांनी अगरवाल कुटुंबियांवर वरदहस्त दाखवल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात मोक्का लावने गरजेचे असतांना केवळ थातुरमातुर कलमे लावण्यात आली होती. आरोपत्रही दाखल करेपर्यंत सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली नव्हती.
नातवाची हमी देणाऱ्या आजोबाचे संबंध गुन्हेगारी जगताशी अल्पवयीन आरोपीला कोर्टात दाखल केले असता, त्याची हमी देण्यासाठी त्याचे आजोबा सुरेन्द्र अगरवाल हे कोर्टात गेले होते. मात्र, सुरेन्द्र अगरवाल यांचे थेट छोटा राजनशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. २००७-२००८ मध्ये एका प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरण सीबीआयला सोपवण्यात आली होती. त्यातील काही प्रकरणात सुरेन्द्र अगरवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. सुरेंन्द्र अगरवाल यांनी छोटा राजनचा हस्तक विजय तांबटची बँकॉक येथे भेट घेतली होती. सुरेंन्द्र यांचे भावासाोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने त्यांची मदत करण्याची मागणी त्यांनी केली होती. यानंतर अजय भोसले या व्यक्तीचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आले.