
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गोरक्षेच्या नावावर देशात ठिकठिकाणी होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटना हिंदू धर्म आणि संस्कृतीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे.
अखिल भारतीय सामाजिक सद्भाव समितीकडून आयोजिक केलेल्या दोन दिवसीय बैठकीत बोलताना मोहन भागवत म्हणाले की, देशभरात हिंदू धर्माला आणि संस्कृतीला बदनाम करण्याचे मोठं षडयंत्र रचले जात आहे. मॉब लिंचिंगच्या नावाखाली समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे काम सुरु आहे. गोरक्षेच्या नावाखाली अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना होत आहेत. काही राज्यात तर एक योजनेद्वारे धर्म परिवर्तन केले जात आहे. देशात आज जी परिस्थिती आहे ती पाहता संघाच्या सर्व प्रचारकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे देखील श्री.भागवत यांनी म्हटले आहे.