भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेसाठी लागणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरच्या ठिकाणी गाळ काढत असतांना क्रेनमध्ये उतरलेल्या विजेचा धक्का लागल्याने एका १६ वर्षीय अल्पवयीन कामगार मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. तर इतर ४ कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. सखाराम जिना बारेला वय-१७ रा. गंगापूर ता.जामनेर असे मयत झालेल्या अल्पवयीन कामगार मुलाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ भुसावळ रेल्वे विभागाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पावरा समाज बांधव हे काम करत असतात. याच पद्धतीने भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर जवळ असलेल्या टाकीमधून गाळ क्रेनच्या सहाय्याने करत होते. यावेळी क्रेनमध्ये विद्यूत प्रवाह उतरलेला होता. यावेळी गाळ काढत असतांना सखाराम हिना बारेला याला जोरदार विजेचा झटका बसला, त्यामुळे त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला, शिवाय सोबत असलेले इतर चार कामगार हे किरकोळ जखमी झाले असून ते थोडक्यात बचावले आहे. ही घटना शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सुमारास घडली आहे. सखाराम बारेला व काही समाजबांधव हे गेल्या एक महिनाभरापासून तिथे काम करत आहे. दरम्यान या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.