मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईत मोठा धक्का दिला आहे. आदित्य ठाकरेंच्या अतिशय जवळच्या नगरसेविका असलेल्या गोराईच्या माजी नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून त्यांची ओळख होती.
एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेसाठी केलेले काम मोठे आहे. त्यांच्या कामाचा धडाका मोठा आहे. शिवाय महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण सारखी योजना आणली. यातून प्रभावीत होवून आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची प्रतिक्रीया संध्या दोशी यांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात आपण नाराज नव्हतो. आपली कोणतीही तक्राही नाही. केवळ एकनाथ शिंदेंच्या काम करण्याच्या शैलीमुळे आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी शाखा प्रमुख आणि असंख्य कार्यकर्त्यांसह त्या शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला लागेला हा मोठा धक्का आहे.