मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंप्री शिवारात ओमनी वाहनातून विनापरवाना गोमांस याची वाहतूक करणाऱ्या तीन जणांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली असून याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंपरी शिवारातून अवैधपणे वाहनातून गोमास वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी 30 मार्च रोजी दुपारी साडेअकरा वाजता कारवाई करत ओमनी वाहन क्रमांक (एमएच १९ वाय ५१०३) ही रस्त्यावर अडवली. त्यावेळी या वाहनांमध्ये गोणपाटमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस भरलेले दिसून आले. या संदर्भात पोलिसांनी संशयित आरोपी मोहम्मद फारुख शेख नसीर मन्यार, असीफ इब्राहिम कुरेशी दोन्ही राहणार मुक्ताईनगर आणि मेहमूद कुरेशी रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४४५ किलो गोमांस जप्त केले आहे. त्यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.