अमळनेर प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील बिडगाव येथील पाटील माध्यमिक विद्यालयात 22 मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल ओंकार पाटील यांच्याहस्त डिजीटल कक्षेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सेवा फाऊंडेशन पूणे येथील युवक मित्रपरिवार पूणेचे संस्थाध्यक्ष प्रविण महाजन साहेब हे होते
विद्यालयाचे चेअरमन प्रा.विनायक ओंकार पाटील व मुख्याध्यापक एस.एम.पठार उपस्थित होते. यावेळी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून तसेच संगणक सुरू करून सुसज्ज संगणक कक्षेचे उद्घाटन करण्यात आले. तीन महिन्यापूर्वी देवू केलेले संगणकाचे 5 सि.पी.यू युवक मित्र परिवाराचे अध्यक्ष प्रविण महाजन, पूणे यांनी विद्यालयास भेट दिले . यावेळी त्यांनी संगणकाचे आपल्या जीवनात महत्व व आपल्या मातीशी नाळ ठेवून सामाजिक कार्याचे महत्व विषद केले. अभ्यास व परिश्रम करुन देशसेवा करण्याचे आवाहन केले. विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विविध क्षेत्रातील यशाचे कौतूक केले. संगणक कक्षेविषयी सविस्तर माहिती मुख्याध्यापक एस.एम. पठार यांनी दिली. यावेळी जेष्ठ शिक्षक एस.पी. महाजन तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय आर.आर.वाघ यांनी करून दिला. सूत्रसंचालन पी.एन. पाटील व आभार जेष्ठ शिक्षक के.ई.बडगुजर यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी व सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी के.बी.पाटील, एस.व्ही. पाटील, एस.एस. सावकारे, राजू साळूंके, रामू पाटील, बारक तडवी यांनी परिश्रम घेतले.