जळगाव प्रतिनिधी । शहरातील आनंद नगरातून तरूणाची २० हजार रूपये किंमतीची महागडी सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तेजस प्रमोद बियाणी (वय-२०) रा. आनंद नगर रिंगरोड येथे आईवडीलांसह राहतात. त्यांच्याकडे २० हजार रूपये किंमतीची महागडी सायकल आहे. ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता सायकल त्यांच्या घरी पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्याने सायकल चोरून नेल्याचे ७ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. परिसरात सायकलची शोधाशोध केली परंतू आढळून आली नाही. तेजस बियाणी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक फिरोज तडवी करीत आहे.