दुचाकी घसरली ; दोघं जखमी

7fb05455 8e97 4c67 bbcc 4704ef9c8d01

 

जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील किनगाव येथून पुरो गोराडा येथे अंत्यविधीसाठी जात असताना सांगवीगावाजवळ दुचाकी घसरल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडलीय. दोघं जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव राजाराम तायडे (वय -45) आणि त्यांची आई गंगाबाई राजाराम तायडे (वय-65, दोन्ही रा. किनगाव ता. यावल) हे पुरो गोरडा येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आपली दुचाकी क्रमांक (एमएच 19 बीझेड 4102) वरून जात असतांना सांगावी गावाजवळ आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी अचानक घसरली. या अपघातात दोघांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. किनगाव येथे प्राथमिक उपचार करून दोघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content