रावेर(प्रतिनिधी) । तालुक्यातील पुरी परीसरात पुन्हा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात हल्ला करत ठार मारले आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली असुन यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन या परीसरातील नागरीकांनी सर्तक राहण्याचे अवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वनविभागाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पूरी परीसरात दोन दिवसांपुर्वी बिबट्याने हल्ला करत गाईला फस्त केले होते. ही घटना ताजी असतांना बिबटाने पुन्हा वगारीवर हल्ला करीत ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पूरी येथील मुरलीधर शंकर पाटील यांच्या घरासमोर बांधलेली वगारवर रात्री 2.30 वाजता हल्ला करीत ठार मारले, याची माहिती वनविभागाला मिळताच वनक्षेत्रपाल आर.जी. राणे यांच्या सूचनेवरुन आहिरवाडीचे वनपाल अतुल तायडे, रविंद्र तायडे, सजंय भदाणे, सुनिल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पायांचा शोध घेतला असता तो बिबट असल्याचे निष्पन्न झाले असून नागरिकांनी सर्तक राहून जवळ फटाके ठेवण्याचे अवाहन वनपाल अतुल तायडे यांनी केले आहे.