भुसावळ प्रतिनिधी । निंभोरा येथील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस तीन वर्षाची सक्त मजूरी आणि 15 हजार रूपयाचा दंड अशी शिक्षा भुसावळ सत्र न्यायालयाचे न्या. आर.आर. भागवात यांनी सुनावली आहे. कृष्णा काशिनाथ सोनवणे रा. निंभोरा ता. यावल असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, पिडीत मुलगी ही निंभोरा येथील रहिवासी असून तिच्या आईवडीलांसोबत राहत होती. त्याच गावातील आरोपी कृष्णा काशिनाथ सोनवणेने 11 सप्टेंबर 2012 रोजी तीला फुस लावून जबरदस्तीने रिक्षात बसून पळवून नेले होते. तसेच आपल्या सोबत लग्न न केल्यास तीच्या वडीलांचा खुन करण्याची धमकी देखील दिली होती. आरोपी कृष्णा सोनवणे याने निंभोराहून प्रथम जळगांव नंतर रावेर, बऱ्हाणपूर तेथुन निबोला व खापरखेडा येथे त्याचे आत्याकडे नेले. पिहीतेचे वडील पोलीसात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीचे मेहूणे व आतेभाऊ यांनी आरोपीसह पिडीतेस निभोरा पोस्टेला आणून सोडले. पो.स्टे.ला आणल्यावर पिडीतेने आरोपी विरुद्ध १३ सप्टेंबर १२ रोजी फिर्यादीवरून आरोपी कृष्णाच्या विरोधात निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी आज भुसावळ न्यायालयात कामकाज झाले असता आरोपीस 3 वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आणि 15 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारतर्फे खटल्याचे कामकाज सहा सरकारी वकील अॅड. पी.पी. भोंबे यांनी पाहिले तर आरोपीतर्फे कामकाज अॅड. प्रफुल्ल पाटील यांनी पाहीले.