Home Cities भुसावळ भुसावळ पोलीस वसाहतीत कारला आग (व्हिडीओ)

भुसावळ पोलीस वसाहतीत कारला आग (व्हिडीओ)


car burning

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील पोलिस वसाहतमध्ये उभ्या असलेल्या एका वॅगेनार कंपनीच्या कारला पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भडका घेतला यामध्येपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली.

याबाबत माहिती अशी की, पोलिस वसाहतीमधील बिल्डिंग क्रमांक 11च्या समोर छाया राजेंद्र पाटील यांच्या मालकीची वॅगनार कंपनीची कार क्रमांक (एमएच 19 बीजे 2666) नेहमीप्रमाणे उभी होती रात्री 1.30 वाजेच्या सुमारास कारला अचानक आग लागल्याने पूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आग विझविण्यासाठी आजूबाजूचे नागरिक धावून आले मात्र तोपर्यंत पूर्णपणे कार जळून खाक झाली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

<ifram


Protected Content

Play sound