यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल येथील भारतीय जनता पक्षाचे तरुण व सक्रीय कार्यकर्ते भुषण जगन्नाथ फेगडे यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निलेश गंगाराम चव्हाण यांच्या वतीने निवड करण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल लोनेकर यांच्या नेतृत्वाखाली भुषण फेगडे यांच्या निवडीचे भारतीय जनता पक्षाचे पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण, जेष्ट जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शरद जिवराम महाजन,यावल तालुका खरेदी विक्री शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन नरेन्द्र नारखेडे, संचालक हेमराज उर्फ बाळु फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील,भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भाजपाच्या सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे, भाजपा किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपुत आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे .