भुसावळच्या ‘रनर ग्रप’ने साजरी केली अनोखी गुरुपौर्णिमा

3dd92621 3682 49f0 98ca 93cbca319603

भुसावळ, प्रतिनिधी | येथील स्पोर्ट्स अँड रनर असोसिएशनच्या सदस्यांनी आपले गुरू प्राध्यापक व प्रवीण फालक यांच्यासह रनिंग करून अनोख्या पद्धतीने नुकतीच गुरुपौर्णिमा साजरी केली. यावेळी प्रत्येक सदस्याने पाच किलोमीटर रनिंग करून आपला त्या दिवसाचा रन हा फालक यांना समर्पित केला.

 

रनिंग झाल्यानंतर लोणावळा येथील ‘वर्षा मॅरेथॉन २०१९’ मध्ये आपल्या वयोगटात (५१ते६०) विजयी ठरलेल्या प्राध्यापक प्रवीण फलक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रवीण पाटील यांनी प्रवीण फालक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनाचा कसा फायदा झाला हे नमूद केले. यावेळी ब्रिजेश लाहोटी, तरुण बिराया, सचिन अग्रवाल, सुनील सोनगिरे, डॉ.निर्मल बलके हे उपस्थित होते. तसेच वर्षा मॅरेथॉनमध्ये आपल्या वयोगटात (४१ते५०) द्वितीय ठरलेल्या प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.तुषार पाटील यांच्यासह डॉ.प्रविण वारके, रणजीत खरारे, डॉ. गोपाळ सोनवणे, प्रा.संजीव भटकर व प्रमोद शुक्ला यांचीही यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर दीपेश परदेशी यांचा डॉ. चारुलता पाटील, ज्योती सोनवणे, योग शिक्षिका पूनम भंगाले, प्राध्यापिका माधुरी गुजर व मयुरी सराफ या महिला धावपटूंतर्फे लोणावळा मॅरेथॉन मध्ये यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन चारुलता पाटील यांनी केले. अमित अग्रवाल, निलेश लाहोटी, श्रीयुत खापरे, अमर गोगीया, विलास पाटील, डॉ. मनोहर गायकवाड, अंकीत पोतदार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सुनील सोनगिरे यांनी केले.

Protected Content