भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मणिपूर राज्यात झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी भुसावळ शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जोदार निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मणिपूर राज्यात गेल्या २ महिन्यापासून हिंसक घटना घडत आहे. तसेच दोन गटातील वाद विकोपाला गेले आहेत. महिलावरील अत्याचार वाढले असून तिथे महिलांना विवस्त्र करून अत्याचार करण्यात आला. दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली. या अमानवी घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध नोंदविल्या जात आहे. सोमवारी २४ जुलै रोजी भुसावळ शहरातील सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जोरदार निदर्शने केली व यावेळी तालुका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.