भुसावळ प्रतिनिधी | तब्बल २५ टक्के व्याजाने घेतलेल्या कर्जाची फेड करून देखील मुद्दलासाठी महिलेस मारहाण करणार्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, रजनी प्रवीण चांदणे (रा.पंचशील नगर, भुसावळ) यांचे पती प्रवीण चांदणे हे पेंटरचे काम करतात. तीन महिन्यापूर्वी त्यांनी रफिक पिंजारीकडून एक हजार रूपये घेतले होते. हजार रुपयांच्या मोबदल्यात चांदणे यांनी पिंजारीला चार हजार रूपये दिले. मात्र, आरिफने चांदणेंचे घर गाठून आरडाओरड केली. यावेळी घराबाहेर आलेल्या रजनी चांदणे यांनी पती घरी नसल्याचे सांगितले. मात्र, आरिफने मी हजार रूपयांचे व्याज घेण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. रजनी चांदणे यांनी त्यास आम्ही तुम्हाला आतापर्यंत चार हजार रूपये दिले आहे. पती रात्री घरी आल्यावर हिशोब करू, असे सांगितले. याचा राग आल्याने आरिफने महिलेस मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणी आरिफ रफीक पिंजारी (रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) याच्या विरुद्ध अवैध सावकारीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक महेश घायधड करत आहे.