भुसावळ प्रतिनिधी | उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असलेल्या भुसावळ नगरपालिकेचे तब्बल चार वर्षांपासून लेखा परीक्षण झाले नसल्याने हे परीक्षण केव्हा होणार असा सवाल भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नाशिक विभागातील सर्वांत मोठी अ वर्ग नगरपालिकेचे गेल्या चार आर्थिक वर्षांचे लेखापरिक्षणच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी माहिती अधिकारातून याबाबत पालिकेला विचारणा केली होती. यातून ही माहिती समोर आली. तसेच दोन वर्षांच्या लेखा परिक्षणाच्या त्रुटींची पुर्तता करण्यास विलंब झाल्याने ही प्रक्रिया रखडल्याचे प्राथमिकही निदर्शनास आली आहे. पालिका प्रशासनाने सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखापरिक्षा, जळगाव यांना लेखा परिक्षणाबाबत कळवले होते. यानुसार त्यांनी पालिकेला ४ जानेवारी रोजी सन २०१६ – १७ व २०१८ -१९ या आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षासाठी अभिलेख मागणी केली होती. तसा अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. यानंतरच सन २०१६ – १७ ते २०१९ – २०२० या वर्षांचे लेखापरिक्षणाचे नियोजन करता येईल, असेही नमुद केले होते. अर्थात पालिकेचे चार वर्ष उलटूनही लेखा परिक्षण झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे सन २०१६ ते २०२० दरम्यानचे लेखापरिक्षणाची प्रक्रिया अद्यापही सुरु आहे.
भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी माहिती अधिकारातून याबाबत पालिकेला विचारणा केली होती. यातून ही माहिती समोर आली. भुसावळ नगरपालिका ही नाशिक विभागातील अ वर्ग तसेच मोठी नगरपालिका आहे. यामुळे नगरपालिकेचे लेखापरिक्षण वेळेत होणे अपेक्षीत आहे, मात्र अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या निमित्ताने प्रशासनाची कासगवतीही समोर आली आहे. या प्रकरणी आता तक्रार करणार असून लेखापरिक्षण करावे, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे.