भुसावळ प्रतिनिधी । शहरातील मानवतकर हॉस्पीटलमध्ये तोडफोड करून फरार झालेल्या युवकाला बाजारपेठ पोलीसांच्या पथकाने जेरबंद केले आहे.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरातील पंचशील नगरातील तरुणाला लॉकडाउन दरम्यान डोक्यात लोखंडी रॉड ने मारहाण केल्याची घटना घडली होती. या जखमी तरुणास डॉ.मानवतकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्या दरम्यान तरुणा चा मृत्यू झाला होता.त्यावेळी पंचशील नगरातील तरुणाने डॉक्टरांच्या दवाखान्याचे नुकसान केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या अनुषंगाने डॉ.राजेश मानवतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला दवाखान्याची नुकसान करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या गुन्ह्यातील फरार आरोपी समीर शेख जाकीर शेख (वय ३१ वर्षे राहणार पंचशील नगर, भुसावळ) याचा शोध सुरू करण्यात आला होता.त्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गु रं न ८९६/२०२० महाराष्ट्र राज्य पोलीस वैद्यकीय सेवा बाबत घडणार्या हिंसक कृत्यांना प्रतिबंधक तसेच अधिनियम २०१० चे कलम ४ प्रमाणे भादवी कलम ४२७,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील फरार आरोपीस बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश गोंटला,अनिल मोरे,गणेश धुमाळ,पोकॉ.गजानन वाघ, सुभाष साबळे,रवी तायडे,योगेश महाजन यांच्या पथकाने केली.