भुसावळमध्ये व्यापार्‍यावर धारदार शस्त्राने वार

भुसावळ प्रतिनिधी | सातत्याने गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत राहणार्‍या भुसावळमध्ये आज रात्री एका व्यापार्‍यावर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील रेणुका माता मंदिराच्या पाठीमागे सायंकाळी ०८:०० वाजेच्या सुमारास मोटरसायकलने गोडावून वरून येत असतांना काही अज्ञात इसमांची मोटरसायकल वर येऊन बाबा फोमचे संचालक नवीन किशोर कुकरेजा ( वय ३० राहणार सिंधी कॉलनी) यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली असून जखमीवर येथील खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, सपोनि हरीष भोये, पोना. रविंद्र बिर्‍हाडे, पोकॉ योगेश महाजन यांनी भेट दिली असून तपास सुरू केला आहे.

Protected Content