Breaking : एक कोटींचे दागिने घेऊन बँकेचा मॅनेजर फरार !

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील पांडुरंग टॉकीज भागातील मण्णापुरम गोल्ड बँकेतील सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून युपीतील मॅनेजरने पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

शहरातील पांडुरंग टॉकीज भागात मण्णापुरम गोल्ड बँक असून सोने तारण ठेवून बँकेतर्फे ग्राहकांना लोन देण्यात येते. या बँकेचे सुमारे दोन हजार शंभर ग्राहक असून त्यातील काही ग्राहकांनी सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. या बँकेत दोन महिन्यांपूर्वीच युपीतील एकाला मॅनेजर पदावर नोकरीची संधी देण्यात आली होती मात्र संबंधिताने बँकेतील लॉकरमधून सुमारे दोन किलोहून अधिक सोने चोरून नेल्याचा संशय बँक प्रशासनाने व्यक्त करीत पोलिसांकडे त्याबाबत तक्रार केली आहे.

बाजारमूल्यानुसार या सोन्याचे किंमत एक कोटी रुपयांहून अधिक आहे. घटनास्थळी ऊपविभागाय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली असुन रात्री ऊशिरा पर्यंत गुन्हा नोंद होईल असे सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: