भुसावळ मुद्रांक विक्रेता आणि दस्त लेखक संघटने धरणे आंदोलन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्य शासनाने मुद्रांक छपाई बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात भुसावळ शहरातील मुद्रांक विक्रेता आणि दस्त लेखक संघटनेच्या वतीने भुसावळ तहसील कार्यालयासमोर सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाने १०० आणि ५०० रूपयांचे मुद्रांक छापाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळ शहरासह संपूर्ण देशभरात मुद्रांकन विक्री करणारे वेंडर यांच्यावर उपासमारीची व आत्महत्येची वेळ आलेली आहे. केंद्र सरकारच्या एका निर्णयानुसार यापुढे स्टॅम्प हे बाहेर विक्री न करता फ्रॅंकिंग मशीन व राष्ट्रीयकृत बँकां मार्फतच विकले जाणार असल्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे लाखो तरुण बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच गेल्या अनेक वर्षांपासून केवळ तीन टक्के कमिशन व 30 हजारा पर्यंत स्टॅम्पची विक्रीची मर्यादा होती. ही मर्यादा १ लाखापर्यंत व्हावी व कमिशन १० टक्के वाढून मिळावे व पूर्वीप्रमाणे सर्व स्टॅम्प वेंन्डरांना त्यांचे स्टॅम्प विक्रीचे अधिकार बहाल करावे. अशी मागणी केली होती. परंतू आता तर स्टॅम्प छपाईच बंद करणार असल्याच्या निर्णयामुळे भुसावळ शहरातील मुद्रांक विक्रेता आणि दस्त लेखक संघटनेच्या वतीने भुसावळ तहसील कार्यालयासमोर सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भुसावळ शहरातील २८ मुद्रांक विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला होता.

Protected Content