भुसावळ प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे असतानाही विनाकारण नागरिक रस्त्यावर फिरणाऱ्या नागरीकांची भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी आज दुपारी १ वाजेपर्यंत ४० जणांची ॲन्टीजन टेस्ट केली. त्यात दोन जण बाधित आढळून आले आहे.
दोन्ही बाधित रूग्णांना कोवीड रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दिवसभरात पोलीस प्रशासनातर्फे विविध ठिकाणी ही चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. याप्रसंगी भुसावळ विभागाचे तहसीलदार दिपक धिवरे, उपमुख्य अधिकारी महेंद्र कातोरे, बाजारपेठ सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, सपोनि कृष्णा भोये, गणेश धुमाळ, मंगेश गोंटला, अनिल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, सचिन पोळ, दिपक पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.