भुसावळ प्रतिनिधी । “प्रतिभा वाचवा देश वाचवा ” भुसावळचे प्रतिनिधी डॉ. प्रदीप नाईक, डॉ. नितीन दावालभक्त, डॉ. अर्चना खानापूरकर, राधेश्याम लाहोटी, पं.रवी ओम शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची जळगाव दौऱ्या दरम्यान भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यांना “प्रतिभा वाचवा देश वाचवा” ह्या चळवळी बद्दल मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. आम्ही कुठल्याही जातीय आधारित आरक्षणा विरुद्ध नसून, संविधानाने दिलेल्या खुल्या प्रवर्गातील समाजाचे अधिकाराचे 50 टक्के आरक्षण 22 टक्के पर्यंत कमी झाल्यामुळे अनारक्षित समाजातले लोकं चिंतीत आहोत हे समजावून सांगितले. त्यावर खुल्या प्रवर्गातील जातींच्या प्रतिभावान मुलांवर होणाऱ्या अन्यायावर उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले. यावेळी आमदार संजय सावकारे होते. त्यांनी स्वतः होऊन विषय मांडायला मदत केली व आमची ओळख मुख्यमंत्र्यांशी करून दिली. योगेश मांडे यांनीही भेट घडवून आणण्यासाठी खूप सहकार्य केले. या भेटी प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीश महाजन, आमदार एकनाथराव खडसे पण उपस्थित होते.