सत्यशोधकी विचारांपासून दुरावल्यानेच समाजाचे अधःपतन : डॉ. सुरेश झाल्टे

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ”तळागाळातील बहुजन बहुतेक श्रीमंतीच्या मागे लागून सत्यशोधकी विचारांपासून दुरावल्यानेच समाजाचे अधःपतन झाले” असे मार्मिक प्रतिपादन डॉक्टर सुरेश झाल्टे यांनी केले.कुऱ्हे पानाचे तालुका भुसावळ येथे दिनांक ११ डिसेंबर रोजी सत्यशोधकी समाज संघाचे दुसरे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न झाले त्याप्रसंगी अध्यक्ष मार्गदर्शन करताना डॉक्टर झाल्टे बोलत होते.

अधिवेशनाचे उद्घाटन आमदार श्री चौधरी यांनी मशाल पेटवून केले त्यानंतर तरी उचलण्याचा विधी विधी करते भगवान रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.विचार मंचावर महिला ओबीसी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयाताई मारोतकर,सरपंच कविता उंबरकर,सत्यशोधकी साहित्यिक जी.ए. उगले,सत्यशोधकी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल ,चंद्रकांत चौधरी ,भीमराव खलाणे अनिल महाजन ,मोरसिंग राठोड, बाबुराव धोंगडे,स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील,माळी संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, तेली समाज अध्यक्ष सुनील चौधरी जि.प.माजी सदस्य समाधान पाटील, डॉ.मिलिंद बागुल,नाना पाटील, अरविंद खैरनार,एकनाथ बडगुजर उपस्थित होते.
उद्घाटनपर मार्गदर्शनात आमदार श्री चौधरी म्हणाले की सत्यशोधक चळवळीचे कार्य देशासाठी दिशा दिग्दर्शक व प्रेरणादायी आहे .

प्रास्ताविक संमेलनाचे कार्याध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी केले .सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खेरनार भूमिका मांडताना म्हणाले की,महाराष्ट्रातील सर्व नामवंत शैक्षणिक संस्था या सत्यशोधक चळवळीचे फलित आहे.स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

चर्चासत्रात जळगाव जिल्हा आणि सत्यशोधक चळवळ या विषयावर मार्गदर्शन करताना चळवळीचे अभ्यासक जिए उगले पैठण यांनी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव एरंडोल अमळनेर यावल खिरोदा ते खुरापानाचे गावांमध्ये सत्यशोधक कार्यकर्त्यांचे अतुलनीय प्रेरणादायी योगदान त्यांनी सांगितले सध्या संघाचे कार्यत्यांच्याच कार्याच्या प्रेरणे सुरू असल्याचे उगले म्हणाले .भारतातील शेतकऱ्यांबाबत सत्यशोधक चळवळीची भूमिका मांडताना सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक विश्वासराव पाटील म्हणाले की,”शेतकऱ्यांचे मिळणारे उत्पन्न व विक्रीला मिळणारा भाव यातील प्रचंड तपाळतेमुळे होणाऱ्या नुकसान मिळण्यासाठी कायदेशीर लढा सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून देण्यात येऊन बळीराजाला न्याय मिळवून देऊ.वातावरण निर्मितीसाठी शालेय पातळीवर जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यातून रंगभरण स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा प्रकल्प विजय लुल्हे यांच्या संकल्पनेतून यशस्वीपणे राबविण्यात आला .

अधिवेशनात मंजूर झालेले बारा ठराव

सरकारने शिक्षणाचे बाजारीकरण थांबवावे सत्यशोधक चळवळीचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करावा शेतीला २४ तास वीज पुरवावी .वाघूर धरणातून कुर्हे व परिसरातील शेतीला पाणी मिळावे .शेती शिवारातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.केंद्र शासनाने जाहीर केलेला हमीभाव व प्रत्यक्षात खरेदीचा व्यापार आणि दिलेला दर यातील तफावतीची नुकसान भरपाई रक्कम शासनाने शेतकऱ्यांना द्यावी अशा एकूण १२ मागण्यांचा ठराव बहुमताने अधिवेशनात मंजूर करण्यात आला.ठरावाचे वाचन संयोजन समिती सदस्य प्रमोद उंबरकर यांनी केले.

अधिवेशनातील क्षणचित्रे

* महात्मा ज्योतिराव फुले यांच्यानंतर १३४ वर्षांनी जी. ए.उगले संशोधित सत्यशोधकी झेंड्याचे ध्वजारोहण उगले सरांच्या हस्ते झाले व उपस्थितांनी दिली मानवंदना
* अरविंद खैरनार यांनी घेतली सत्यशोधक समाजाची सामुहिक प्रार्थना
* सत्यशोधकी कार्यकर्त्यांच्या तिसऱ्या पिढीतील वारश्यांचे
प्रमाणपत्र देऊन आमदार चौधरी व मान्यवरांच्या हस्ते सन्मान
* कृषी संस्कृती व परंपरा माहितीयुक्त दिनदर्शिकेचे आमदार व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
* बळीराजा, शिक्षण व परिसरातील समस्यांवर बारा महत्त्वाचे ठराव बहुमताने पारित
* महापुरुषांच्या कार्यकतृत्वाचा अवमान केल्या करणाऱ्या प्रकरणी चंद्रकांत पाटील व राष्ट्रपती भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध
* रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक
* सत्यशोधकी व फुले,शाहू, आंबेडकर यांच्या वैचारीक पुस्तकांची ४ स्टॉल वरून सुमारे २५००० रुपयांची विक्री . . .वाचन संस्कृती
खेडयात संवर्धित होतेय याचा सुखद प्रत्यय
* अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून नागपूर, औरंगाबाद , अकोला, बुलढाणा , ठाणे ,धुळे , येथील सत्यशोधक संघाच्या प्रतिनिधांची उपस्थिती
* सुग्रास भोजनानंतर नागवेल पानाच्या विड्याची मेजवानी देवून पानाचे कुर्हे वासियांची उपस्थितांना भावनिक मानवंदना – विलास
रंदाळे, नामदेव वराडे व संजय वराडे यांचे उत्स्फूर्त आर्थिक योगदान
* भव्य आकर्षक रांगोळी सुशोभन
* अधिवेशनातील नियोजन, कार्यवाही, शिस्त, आपुलकी व सहकार्य बघता अधिवेशन
झाले संस्मरणीय ऐतिहासिक

ग्रामोत्सव

सूत्रसंचालन आनंद सपकाळे व पी.डी.पाटील सर आभार प्रदर्शन योगेश गांधीले यांनी केले.संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ, डॉक्टर समाधान बारी, संजय वराडे ,माजी उपसरपंच विलास रंदाळे , राजीव जाधव ,लक्ष्मण जाधव, ग्रामपंचायत सदस्य शारदा महाजन ,आशा वराडे , शिंदे अरविंद बावस्कर , दत्तू बावस्कर ,प्रमोद उंबरकर सुधाकर बडगुजर , उमेश पाटील,आकाश कुरकुरे , प्रमोद पाटील ( गोंभी ),आशा गागोदेकर , सत्यशोधक जयप्रकाश शित्रे, साळूबा पांडव ,अर्चना तांबे, प्राजक्ता पांडव,कानिफनाथ खरात (औरंगाबाद ), विधीकर्ते शिवदास महाजन,निवृत्ती बाविस्कर,मोहन ताडे, काशिनाथ चौधरी, किरण जाधव,प्रमोद पाटील यांनी अमूल्य परिश्रम घेतले.

Protected Content