भुसावळ प्रतिनिधी | वरीष्ठ पदाधिकार्यांवर मनमानीचा आरोप करत ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तहादुल मुस्लमीन म्हणजेच एआयएमआयएमच्या शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
फिरोज शेख यांनी भुसावळात पत्रकार परिषदेचे आयोजन करून आपण सहकार्यांसह एआयएमआयएमला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले आहे. याप्रसंगी ते म्हणाले की, गेल्या सहा वर्षांपासून एकनिष्ठपणे पक्षाचे काम करत आहोत. मात्र, कोणतीही दखल घेतली गेली नाही. जिल्हाध्यक्ष हे मनमानी करतात. या प्रकाराला कंटाळून माझ्यासह रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष अशरफ हयात तडवी, माजी युवा जिल्हाध्यक्ष नावीद खान, जिल्हा सहसचिव मेहमूद पठाण, कलीम शेख, माजी युवा शहराध्यक्ष इलियाज पटेल, तालुका उपाध्यक्ष अफजल खान, युवा तालुकाध्यक्ष नदीम शेख, रावेर लोकसभा सचिव वसीम शेख, रशीद शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष खालीद प्रवेश, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.जफ्फार कादरी, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडे राजीनाम्याच्या प्रती पाठवणार आहोत, असे फिरोज शेख यांनी सांगितले.
दरम्यान, आपल्यासह इतर सहकार्यांची आगामी काळात नेमकी काय भूमिका असेल याबाबत आपण लवकरच जाहीर करू अशी माहिती देखील फिरोज शेख यांनी या पत्रकार परिषदेत दिली.