Home Cities भुसावळ भुसावळात रक्षाताई खडसे यांच्या विजयाचा जल्लोष ( व्हिडीओ )

भुसावळात रक्षाताई खडसे यांच्या विजयाचा जल्लोष ( व्हिडीओ )

0
23
celebrate

celebrate

भुसावळ प्रतिनिधी । महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांचा दणदणीत मताधिक्याने विजय होणार असल्याचे स्पष्ट होताच भुसावळात प्रचंड जल्लोष करण्यात आला.

रक्षाताई खडसे या रावेर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. आज मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच त्यांना मताधिक्य मिळाले. दुपारपर्यंत त्यांना मोठे मताधिक्य मिळाल्यानंतर शहरातील भाजप पदाधिकार्‍यांनी प्रचंड जल्लोष केला. भाजपचे नेते विजय मोतीराम चौधरी यांनी चौफुलीवर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून या विजयाचा आनंद साजरा केला. याप्रसंगी ते म्हणाले की, हा विजय सर्वसामान्यांचा आणि मोदी साहेबांवरील लोकांच्या विश्‍वासाचा आहे.

पहा : विजय मोतीराम चौधरी यांनी केलेला जल्लोष.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound