भुसावळ (प्रतिनिधी) बनावटी कट्टा बाळगत चोरीच्या उद्देशाने फिरण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या आरोपीला नुकतीच अटक करण्यात बाजार पेठ पोलिसांना यश आले आहे. यशवंत गुणवंत राजपूत( रा.शिरपूर कन्हाळा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, ३१ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास विशाल टाक व त्याचा साथीदार यशवंत राजपूत हे बनावटी कट्टा बाळगुण चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी यशवंत गुणवंत राजपूत (रा.शिरपूर कन्हाळा ता भुसावळ) हा घटनास्थळ पासून फरार झाला होता. तेव्हा पासून त्याचा शोध सुरू होता. पोलीस निरीक्षक दीपक भागवत यांना गुप्त माहिती मिळाली की, यशवंत राजपूत हा नाहाटा चौफुली भागात येणार आहे. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. या पथकात पो.हे.का सुनील जोशी, शंकर पाटील, पो.ना. रमण सुरळकर, पो.का. विकास सातदिवे, ईस्वर भालेराव यांचा समावेश होता. दरम्यान, यशवंत राजपूत यांच्या विरुद्ध बाजारपेठ पो स्टे भाग ६ गुरण ०४१८/२०१९ भादवि कलम ४०१,३४ व आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे दिनांक ३१ जुलै रोजी गुन्हा दाखल आहे.