भुसावळ प्रतिनिधी ।शहरातील यावल नाक्याजवळील रोडवर बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला भुसावळ पोलीसांनी अटक केले. याबाबत भुसावळ शहर पोलीसात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जितेंद्र किसन पाटील वय-49 रा. समर्थ नगर, घोडेपीर बाबाचे हा शहरातील यावल नाक्याजवळील रोडवर रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास विनापरवाना बेकायदेशीर 5 हजार रूपये किंमतीचा देशी बनावटीचा पिस्तूल घेऊन फिरत असल्याची असल्याची माहिती भुसावळ शहर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोउनि नाना सुर्यवंशी यांनी तपासणी केली असता त्याच्या कमरेला पिस्तूल मिळून आला. पोलीसांनी गावठी पिस्तूल हस्तगत करून जितेंद्र पाटील याला ताब्यात घेतले आहे. पो.कॉ. जितेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीसात आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहम्मद अली सय्यद हे करीत आहे.