भुसावळ प्रतिनिधी । शहरातील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ तलवारीसह दहशत माजवणार्या एका तरूणाला बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत यांना निलेश उर्फ गोलू जय सपकाळे (वय-२२ रा.शिवपूर कन्हाळा ता.भुसावळ) हा घोडेपीर बाबाच्या परिसरात तलवारीसह दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. यानुसार त्यांनी बाजारपेठ पोलीसांच्या पथकाला पाठवून त्याला अटक केली. या पथकाने त्याला ताब्यात घेऊन भुसावळ बाजारपेठ पो स्टे ला आर्म अॅक्ट कलम-४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडेे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड तसेच पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे, मंगेश गोटला, पो.हे.कॉ.अयाज सैय्यद, पो. ना.किशोर महाजन, रमण सुरळकर,समाधान पाटील, उमाकांत पाटील,पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश महाजन, कृष्णा देशमुख यांच्या पथकाने केली आहे.