भुसावळ प्रतिनिधी । बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत एलसीबीच्या पथकाने सट्टा पेढ्यांवर धडक कारवाई करून नऊ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.
भुसावळ शहरात बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत अष्टभुजा मंदिर, सोनीेच्छा वाडी, हनुमान नगर असे भागात सार्वजनिक जागी काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण मटका व मिलन डे नावाचा सट्टा जुगार खेळ लोकांकडून आकड्यावर पैसे स्विकारुन खेळ खेळत व खेळवित असल्याचे खात्रीदायक बातमी स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना मिळल्यावरून दिनांक १४ रोजी दुपारच्या वेळेस पाच ठिकाणी छापे टाकून जुगाराचे साधने, लॉपटॉप,रोख रक्कम तसेच मालकासह नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या संदर्भात पोहेकॉ रमेश बाबूलाल चौधरी (स्थनिक गुन्हे शाखा) जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहरातील अष्टभुजा मंदिराच्या समोर असलेल्या रिक्षा स्टॉपच्या आडोशाला मालकासह त्याचा हस्तक रविंद्र रामदास वारके (वय ५४ राहणार हनुमान नगर,पंचवटी मंदिरजवळ भुसावळ) यांचे कडील लोकांकडून सट्टयाच्या बिट अंकावर पैसे स्विकारुन कल्याण व मिलन डे नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आला. आरोपिकडून जुगार साधने व ४,१८० रुपये रोख मिळून आले आहे.
दुसरी कारवाई फिर्यादी पोहेकॉ रवी पंढरीनाथ नरवाडे (स्थनिक गुन्हे शाखा) जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १४ रोजी दुपारी २.५० वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील नहाटा चौफुलीच्या डाव्या बाजूस महात्मा फुले कॉम्प्लेसच्या आडोशाला दिपक कृष्णा महालकर (वय २९ राहणार नेब कॉलनी,आनंद नगर भुसावळ) व संदीप अशोक चौधरी (वय ३२ राहणार दीनदयाल नगर) जुगार खेळतांना मिळून आला. आरोपिकडून जुगार साधने व १४,३५० रुपये रोख मिळून आले आहे.
तिसरी कारवाई पोना किशोर ममराज राठोड (स्थनिक गुन्हे शाखा) जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १४ रोजी भुसावळ शहरातील सोनीेच्छा वाडी, ढेपच्या दुकानाच्या मागे चहाच्या टपरीच्या आडोशाला प्रल्हाद हरी सपकाळे (वय ६५ राहणार दीनदयाल नगर); छोटेलाल ब्रिजलाल दमाळे (वय ५७ राहणार गांधी नगर) हे सट्टा जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आले. आरोपिकडून जुगार साधने व १०,९२० रुपये रोख मिळून आले आहे.
चौथी कारवाई पोकॉ रणजित अशोक जाधव (स्थनिक गुन्हे शाखा) जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १४ रोजी भुसावळ शहरातील सोनीेच्छा वाडी, ढेपच्या दुकानाच्या मागे चहाच्या टपरीच्या आडोशाला संतोष लालगिर गिरी (वय ६० राहणार खडका रोड), गोपाळ व्दारकदास अग्रवाल (वय ६० राहणार शनी मंदिर परीसर) हे सट्टा खेळतांना आढळून आले असून त्यांच्याकडून जुगार साधने व ६९,८० रुपये रोख मिळून आले आहे.
पाचवी कारवाई पोकॉ विनोद सुभाष पाटील (स्थनिक गुन्हे शाखा) जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १४ रोजी दुपारी सोनिच्छा वाडीच्या बाजूला संतोष शंकर तायडे (वय ५० राहणार तुळशीनगर), मारुती वेडू भालेराव (वय ५६ राहणार शिरपूर कन्हाळा रोड ) हे आढळून आले असून आरोपींकडे जुगार साधने व ११,५०० रुपये रोख मिळून आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा जळगांव पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ५८४ रवी नरवाडे, पोहेकॉ १२८५ अनिल इंगळे,पोहेकॉ ३३५ शरद भालेराव,पोहेकॉ ३३२४ दादाभाऊ पाटील,पोना २५४६ संतोष मायकल,पोहेकॉ चालक इंद्रिस पठाण,पोहेकॉ विनोद पाटील,पोकॉ रणजित जाधव,पोना किशोर राठोड,पोहेकॉ रमेश चौधरी,पोहेकॉ शरीफ काझी,स.फौ.अशोक महाजन,पोना युनूस शेख,पोकॉ दीपक चौधरी,पोकॉ हरिष परदेशी, पोकॉ उमेश गोसावी अशांनी मिळून भुसावळ शहरातील सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापे टाकून कारवाई केली.तसेच आरोपीना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सर्व आरोपितांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपितांविरुद्ध मुंबई जुगार अँक्ट कलम १२(अ) भा.द.वि कलम १०९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.