भुसावळच्या विकास कामांसाठी पावणेचार कोटींचा निधी

भुसावळ प्रतिनिधी– भुसावळ शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, गटारी आणि अन्य कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना आणि नागरी दलीत्तेतर वस्ती सुधार योजनांच्या अंतर्गत पावणे चार कोटी रूपयांच्या कामांना Fund प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार संजय सावकारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा भरीव निधी मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरातील रस्त्यांच्या कामांबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आधीच भरीव निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. या संदर्भात आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केला. तर नगरपालिका प्रशासनातर्फे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यातील सहा रस्त्यांच्या कामांना सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मधून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

यात कडू प्लॉट ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असणार्‍या दुभाजकाच्या दोन्ही बाजूंचे डांबरीकरण- मूल्य ७० लाख तीन हजार ४७० रूपये; लोणारी मंगल कार्यालय ते राष्ट्रीय महामार्ग वाय पॉईंट (जॉली पेट्रोल पंप)- ३३ लाख, ४५ हजार,४६३; गडकरी नगरातील रस्त्यांचे डांबरीकरण- ३५ लाख ५४ हजार ६११; नवीन नगरपालिका भागातील पाण्याची टाकी ते कोटेचा हायस्कूल ते यावल रस्ता याचे डांबरीकरण करणे- ४२ लाख, ९५ हजार, २२३ रूपयांची मंजुरी मिळाली आहे. या चारही रस्त्यांसाठी एकूण १ कोटी ८१ लाख, ९८ हजार, ७६७ रूपयांची कामे Fund मंजूर करण्यात आली आहेत.

यासोबत, नागरी दलीत्तेतर वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत भुसावळातील प्रभाग क्रमांक ६ मधील भोळे क़ॉलनी
भागातील बल्लाळेश्‍वर नगर पासून ते जळगाव रोड या मार्गावर तुटलेल्या गटारींची दुरूस्ती करणे-७३ लाख, ४३ हजार, ९६७; प्रभाग क्रमांक ६ मध्ये शारदा नगर मेन रोडला लागून असलेले सोहम अपार्टमेंट पर्यंत तुटलेल्या गटारींची दुरूस्ती करणे-४३ लाख, ९१ हजार, ३३५; प्रभाग क्रमांक ६ मध्ये शारदा नगर, भोळे कॉलनी, भालोदकर प्लॉट, सपना नगर या भागांमध्ये रस्त्यांचे कॉक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे, तसेच गुरूद्वार झोपडपट्टीत पेव्हर ब्लॉक बसविणे-५३ लाख, २४ हजार, ६२९ आणि प्रभाग क्रमांक ८ खळवाडी मधील सुभाष बारकू पाटील यांच्या घरापासून संतोष गुजर, रवींद्र भोळे, ज्योती ट्रेडर्स पर्यंत आरसीसीची मोठी गटर बांधणे- २२ लाख,४८ हजार, ३७२ रूपये अशी एकूण एक कोटी ९३ लक्ष, ८ हजार ३०० रूपयांच्या कामांना Fund मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शहरातील विकासकामांसाठी ३ कोटी ७५ लाख ७ हजार ७० रूपयांची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सहकार्य, आमदार संजय सावकारे यांचा पाठपुरावा व मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांच्या प्रशासकीय प्रस्तावांमुळे शहराच्या विकासासाठी हा निधी मिळणार आहे.

Protected Content