भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊन सुरू असतांना एका ढाब्यावरील अवैध दारूविक्रेत्याच्या संपर्कात असल्याचे सिध्द झाल्यावर भुसावळातील चार पोलीसांना तातडीने मुख्यालयात जमा करण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकून एका ढाब्यावरून दोन लाख रूपयांचा मद्यसाठा पकडला होता. हा मद्यसाठा एका पोलिसाचा असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या हॉटेल चालकाशी चार पोलिस कर्मचार्यांचा संपर्क असल्याचे चौकशीत समोर आले. यामुळे डीवायएसपी गजानन राठोड यांनी या प्रकरणी चौकशी केली होती. त्यांनी दिलेल्या गोपनीय अहवालानुसार पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यातील तीन व शहर पोलिस ठाण्यातील एक अशा चार जणांचे मुख्यालय बदलीचे आदेश गुरूवारी काढले.
पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार आता नरेंद्र चौधरी, नीलेश बाविस्कर, सुनील सैंदाणे व प्रशांत चव्हाण या चार पोलिस कर्मचार्यांची तातडीने पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००