भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विभागातील स्टेशन मास्तरांनी ऑल इंडीया स्टेशन मॅनेजर असोशिएशनच्या माध्यमातून विमा संरक्षणासह विविध मागण्यांसाठी डीआरएम कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
विजय झुंजेराव, विजय पाटील, ए.के.नारखेडे, सुधीर गरूड, उपेंद्र कुमार, रणावत प्रसाद, धीरज कुमार, सियाराम मीना, संतोष त्रिपाठी यांच्यासह अन्य स्टेशन मास्तरांनी सकाळी १० ते सायंकाळी पाच या कालावधीत धरणे आंदोलन केले. यानंतर विविध मागण्यांबाबत डीआरएम विवेककुमार गुप्ता यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नवीन स्टेशन मास्तरांना मिळणारे स्टायपेंड तात्काळ अदा करावे, ग्रेड पे ५४०० स्टेशन मास्तरांना तात्काळ दिली जावी, यासह अन्य मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांची पूर्तता करावी, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.