भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या आज झालेल्या अर्थसंकल्पीय सभेकडे एक नगरसेविकेचा अपवाद वगळता विरोधी सदस्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
भुसावळ नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मीताई मकासरे,गटनेते मुन्ना तेली आणि मुख्याधिकारी उपस्थित होते. कालच संतोष चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेत आजची सभा ही बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमिवर, आजच्या सभेत फक्त नूरजहा आशीक खान यांचा अपवाद वगळता विरोधी पक्षाचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. दरम्यान, आजच्या बैठकीत भुसावळ नगरपालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यात विविध माध्यमातून अपेक्षित असणारे उत्पन्न आणि खर्च याचा अंदाज सादर करण्यात आला.