भुसावळ प्रतिनिधी | सातत्याने गुन्हेगारीबाबत चर्चेत असणार्या भुसावळमध्ये रात्री एका तरूणाचा खून झाल्याची घटना समोर आली असून त्याला अतिशय क्रूरपणे संपविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील जामनेर रोडवर श्रध्दा कॉलनीत असणार्या गजानन महाराज मंदिराच्या समोर मध्यरात्रीनंतर एका तरूणावर चाकून सपासप वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या तरूणाचा चेहरा दगडांनी ठेचून टाकण्यात आला आहे. मयत तरूणाचे वय हे सुमारे ३० ते ३५ च्या आसपास असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पहाटे या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरिक्षक दिलीप भागवत आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याचा पंचनामा करण्यात आला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृत तरूणाचा चेहर दगडांनी ठेचून टाकल्यामुळे त्याची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, या तरूणाला अतिशय क्रूर पध्दतीत संपविण्यात आल्याचे पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.