भुसावळ शहराच्या हद्दवाढीबाबत नगरपालिकेची सभा

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील हद्दीवाढीवरील चर्चेसाठी आज नगरपालिकेची विशेष सभा घेण्यात आली.

याबाबत वृत्तांत असा की, शहराच्या भोवती मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती झाली असून ते विविध गावांच्या हद्दीमध्ये समाविष्ट आहेत. एका अर्थाने ते शहरात राहत असले तरी ते कागदोपत्री विविध ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वास्तव्यास आहेत. या पार्श्‍वभूमिवर, भुसावळ शहराची हद्दवाढ करण्यात यावी या विषयावर चर्चा करण्यासाठी आज नगरपालिकेची सभा घेण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, गटनेते मुन्ना तेली आदी मान्यवर होते. याप्रसंगी जनआधार आघाडीच्या सदस्यांनी शहराची हद्दवाढ करण्याची मागणी केली. यावर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी या मागणीवर प्रस्ताव तयार करून निर्णय घेण्याची अनुकुलता दर्शविली.

या सभेत ज्येष्ठ नगरसेवक युवराज लोणारी, लक्ष्मीताई मकासरे, राजेंद्र नाटकर, प्रमोद नेमाडे आदींसह सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक उपस्थित होते.

Add Comment

Protected Content