भुसावळ प्रतिनिधी । भुसावळातील नहाटा चौफुलीजवळ अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्यास भुसावळ पोलीसांनी अटक करत त्यांच्या ताब्यातील गावठी कट्टा हस्तगत केला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात आर्म ॲक्टनुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी रमाकांत वेडु वाघ (वय-42) रा.महात्मा फुले नगर भुसावळ हा शहरातील नहाटा चौफुलीच्या पाण्याच्या टाकीजवळ विना परवाना अवैधरित्या गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी एक पथक तयार करून 9 रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता पो.नि. दिलीप भागवत, सपोनि रावसाहेब किर्तीकर, पो.ना.रमण सुरळकर, पो.कॉ. कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव यांनी संशयित आरोपी रमांकात वाघ याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता संशयास्पद व उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यांची अंगाची झडाझडती घेतली असता कमरेला 15 हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा व 500 रूपये किंमतीचा जिवंत काडतूस आढळून मिळला. गावठी कट्टा व जिवंत काडतूस हस्तगत करत त्याल अटक केली. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहेकॉ सुनिल जोशी करीत आहे.