भुसावळ संतोष शेलोडे । भुसावळात गुन्हेगारांविरूध्द धडक कारवाई सुरू झाली असून यात काही दिवसांमध्येच १५ कट्टे जप्त करण्यात आले आहेत. कुणाची हयगय न करता ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती डीवायएसपी गजानन राठोड यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिली.
व्हिडीओसह सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
गेल्या काही दिवसांपासून भुसावळसह परिसरात गुन्हेगारांच्या विरूध्द जोरदार कारवाई सुरू करण्यात आली असून तब्बल १५ कट्टांसह आरोपींना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की, जिल्ह्यात एवढी मोठी कारवाई याआधी कुठल्याच पोलीस स्टेशनला झाली नसून बाजारपेठ पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन,तालुका पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम अशांनी मिळून संयुक्त कारवाई करून सराईत गुन्हेगारांकडून १५ गावठी कट्टे पोलिसांनी हस्तगत केले असून गुन्हेगारांच्या मुळापर्यत जाणार असे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी सांगितले.
डीवायएसपी राठोड पुढे म्हणाले की, सध्या भुसावळात गोळीबार प्रकरण झाले असून शहर पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी दहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गावठी कट्टे ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढ्यात हा तपास थांबला नसून याचे धागेदोरे मध्यप्रदेश मध्ये आहेत. या प्रकरणाशी संबंधित असणार्या गुन्हेगारांना तसेच पुढार्यांना क्षमा केली जाणार नसून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत,शहर ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,सपोनि स्वप्नील नाईक स्थानिक गुन्हे शाखा, तसेच बाजारपाठचे पोकॉ विकास सातदिवे यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यात प्रथमच एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
खरं तर, गावठी कट्टे जप्त करण्यासह आरोपींना अटक करण्यात येते. पण काही दिवसातच आरोपींची सुटका होत असल्याने ते पुन्हा शहरात गुन्हे करीत असल्याचे दिसत आहे. अशांना पोलिसांनी खाकी दाखवून कठोर कारवाई करण्याची गरज आहे.की पुन्हा गुन्हेगारांनी डोके वर काढण्याची हिम्मत व्हायला नको.तसेच गुन्हेगारांना आसरा देणारे पांढरे पोशाख परिधान करणारे पुढारी यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कारण भुसावळातील गुन्हेगारांना पुढार्यांचा आश्रय असल्याचे दिसून येत असून हा दबाव झुगारून पोलिसांनी कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
खालील व्हिडीओत पहा गजानन राठोड यांनी दिलेली सविस्तर माहिती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1209171826097273